कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे भारताचा कायम द्वेष करतात, त्यासाठी त्यांनी खलिस्तानवादी अतिरेक्यांना पाठिंबा देत आहे. भारतावर खलिस्तानीवादी अतिरेकी निज्जर जे कॅनडाचे नागरिक होते, त्यांची भारताने हत्या केल्याचा आरोप करत भारतावर खोटे आरोप केले होते. त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातही संबंध ताणले होते.
(हेही वाचा मुख्यमंत्री बनायचे आहे का? काय म्हणाले Devendra Fadnavis?)
कॅनडाच्या (Canada) जस्टिन ट्रूडो सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्राला भारताविरुद्ध गुप्तचर आणि संवेदनशील माहिती लीक केल्याची कबुली दिली आहे. ट्रूडोच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार नताली ड्रोविन यांनी संसदीय समितीला सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा एक उच्च अधिकारी कॅनडामध्ये (Canada) निज्जर यांच्यावर हल्ला करण्याच्या कटात सामील होता. ही गोपनीय माहिती लीक करण्यासाठी आपल्याला पंतप्रधानांची मान्यता देण्यात आलेली नाही, असे ड्रोविनने सांगितले. वास्तविक गोपनीय माहिती लीक करणे हा संवाद धोरणाचा भाग होता.
Join Our WhatsApp Community