केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission of India) गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून दि. २८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Election Commissioner of India Rajeev Kumar) यांनी निवडणूकीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीतील महत्त्वाच्या मुद्यांची माहिती दिली. ज्यामध्ये उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा अंतर्भूत होता.
यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली, तर त्या पक्षाला आणि संबंधित उमेदवाराला किमान तीन वेळा गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात माहिती वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन प्रसिद्ध करणे बंधनकारक असेल. तसेच पक्षाने संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीलाच उमेदवारी का दिली? हे सुद्धा स्पष्ट करावे लागेल. जेणेकरून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा उमेदवार पक्षाने का निवडले हे मतदारांना कळेल, अशी माहिती कुमार यांनी दिली. मात्र एका पत्रकाराने या निर्णयाचे उल्लघंन करणाऱ्यांना काय शिक्षा होणार?, असा सवाल कुमार यांना विचारला. तेव्हा त्यांनी सर्वेाच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानुसार या नियमाची अंमबजावणी केली जात असल्याचं सांगितले. त्यामुळे अशा जाहिराती गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांकडून प्रसिद्ध केल्या जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : Hezbollah leader Hassan Nasrallah हवाई हल्ल्यात ठार, लेबनॉनला मोठा धक्का
सध्या दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपत असून लवकरच विधानसभेच्या निवडणूका होणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात कुमार (Election Commissioner of India Rajeev Kumar) यांनी पत्रकारांना सर्वात आधी मतदानाचे टप्पे आणि तारीख (assembly election 2024 schedule) सांगितली जाईल, असेही सांगितले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community