मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्यावर गुन्हा दाखल!

118

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी फिर्याद दिली असून @bhujangashetti या ट्विटर हॅंडलच्या चालकावर भादवि कलम १५३ (अ), ५००, ५०५ (२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या २६ गावांतील रहिवाशांचे पुनर्वसन होणार )

साळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदरील ट्विटर हॅंडलमुळे समाजात असंतोष निर्माण होईल, या उद्देशाने ११ ते १४ ऑक्टोबर, २०२२ दरम्यान आक्षेपार्ह, महिलांना अपमानास्पद, लज्जास्पद आणि आपत्ती निर्माण होईल, असा मजकूर पोस्ट केलेला आहे’असेही साळी यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या संदर्भात माहिती देताना देताना साळी म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह टीका आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. त्यांना कडक कायदेशीर भाषेतच उत्तर दिले जाईल. समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी काही घटक यात जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी’.

महाराष्ट्र सायबर अधिक्षकांकडे कडक कारवाईची युवा सेनेची मागणी

सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी युवा सेना सचिव किरण साळी यांनी राज्याच्या सायबर सेलचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांच्याकडे केली आहे. कारवाईच्या मागणीचे पत्र साळी यांनी शिंत्रे यांना दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिंत्रे यांनी दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.