भाजपच्या हेमंत रासनेंविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

188

कसब्यामधील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप हेमंत रासने यांच्यावर करण्यात आला असून पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!” मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम)

हेमंत रासनेंविरोधात गुन्हा दाखल

भाजपचे उपरणे परिधान करून मतदान केंद्रात आल्याने रासने यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी हेमंत रासने नूतन मराठी विद्यालय प्रशाला बुध क्रमांक ७५ याठिकाणी गेले असताना त्यांनी भाजपचे चिन्ह कमळ असलेले उपरणे घातले होते. निवडणुकीचा प्रचार संपल्यावर त्यांनी हे कमळाचे उपरणे घालून प्रचार केल्याचे यावरून निदर्शनास येते ही बाब गंभीर असून त्यांच्यावर निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना पुणे शहर उद्धव गटाच्यावतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आता पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हेमंत रासनेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.