मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण करणं ठाकरे गटांतील ‘या’ नेत्यांना भोवलं, ७ जणांवर गुन्हा

181

ठाण्यात झालेल्या महाप्रबोधिनी यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणं केल्याप्रकरणी ठाकरे गटातील काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – ठाकरे गटाची निवडणूक चिन्हावरून कोंडी? ‘या’ पक्षाचा ‘मशाली’वरही दावा! निवडणूक आयोगाकडे धाव)

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये महाप्रबोधिनी यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून शिंदे गटाचे दत्ताराम ऊर्फ बाळा सखाराम गवस यांनी ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव, खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, ठाणे महिला आघाडी अध्यक्षा अनिता बिजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, ठाणे शहरप्रमुख केदार दिघे, नगरसेवक नरेश मणेरा, सुभाष भोईर, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे आणि सूत्रसंचालक सचिन चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिंदे गटातील दत्ताराम ऊर्फ बाळा सखाराम गवस सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या सात जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. राजन विचारेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या आणि उपनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करण्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर आरोप केले. याच आरोपांवर नौपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेते, उपनेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.