ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sanjay Raut)
राऊत यांच्यावर गुन्हा दाखल
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी याबाबत शुक्रवारी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा निवडणूक शाखेकडून राऊत यांच्यावर कारवाईबाबत कोतवाली पोलिसांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानं राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम 171(क) 506 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 123 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sanjay Raut)
प्रकरण नेमकं काय?
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत बोलताना संजय राऊत यांनी औरंगजेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला होता, असा दावा केला होता. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलं तर तू कोण? असा पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख संजय राऊत यांनी केला होता. (Sanjay Raut)
(हेही वाचा –Uddhav Thackeray: राज ठाकरेंच्या मागण्यांवर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ?)
खासदार संजय राऊत म्हणाले होते की, “आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल. औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला होता, तेथील माती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतील हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी औरंगजेब्याच्या वृत्तीने हे दोन व्यापारी वागत आहेत. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला आहे. तर तू कोण?” (Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community