वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या खासदार Arvind Sawant यांच्यावर गुन्हा दाखल

166
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या खासदार Arvind Sawant यांच्यावर गुन्हा दाखल
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या खासदार Arvind Sawant यांच्यावर गुन्हा दाखल

शिवसेनेकडून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघासाठी शायना एनसी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरोधात राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली. अशातच खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी एनसी यांच्यावर केलेल्या विधानामुळे सावंतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून शायना एनसी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

( हेही वाचा : BMC : आयुक्त जेव्हा आपल्या सफाई कामगारांच्या घरी सपत्नीक भेट देत दीपावली साजरी करतात तेव्हा…

दरम्यान शायना एनसी म्हणाल्या की, अरविंद सावंत (Arvind Sawant) हे महिलांकडे माल म्हणून पाहतात. मात्र २० वर्ष राजकारणात राहून स्वत:च अस्तित्त्व निर्माण करणे त्यांना दिसत नाही. त्यावरुन अरविंद सावंत यांच्या मानसिक स्थिती आणि मनस्थितीची माहिती होते. यामुळे महाराष्ट्रातील महिला उबाठा गटाला मतदान करणार नाही. महिलांचा सन्मान केला तर महिला तुमचा आदर करतील. परंतु तुम्ही महिलांना माल बोलत फिरलात तर २० नोव्हेंबरला जे हाल होतील, हे बघाच, असा इशारा ही त्यांनी सावंत यांना दिला.

काय म्हणाले अरविंद सावंत?(Arvind Sawant)

आमच्याकडे इंपोटेंट माल चालत नाही, ओरिजनल मालच इथे चालतो. तसेच मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीत फक्त आपलाच माल चालेल आणि तो म्हणजे अमीन पटेल, असे विधान अरविंद सावंत यांनी केले होते.

वाचळवीरांनी आपल्या वाचाळांना आवर घालावा

महाराष्ट्राला संस्कृतीतेची परंपरा लाभलेली असताना राजकीय सुसंस्कृतपणा जपणे गरजेचे आहे. आपले वकृत्त्व कितीही प्रभावी असले तरी सुसंस्कृतपणा जपावे. तसेच विरोधकांवर टीका करताना त्या पक्षांतील वाचळवीरांनी आपल्या वाचाळांना आवर घालावा, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्यावर केली आहे.

हेही पाहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.