दिल्लीच्या CM Atishi यांच्यावर गुन्हा दाखल

99

राजधानी दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. इथे आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढत असल्याने या ठिकाणी आता तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसने आम आदमी पक्षावर टीका केल्यानंतर आप ला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाच्या नेत्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी (CM Atishi) यांच्यावर नवी दिल्ली जिल्ह्यातील नॉर्थ अॅव्हेन्यू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आम आदमी पार्टी बनावट फोटो वापरून प्रचार करत असल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. दुसरीकडे गोविंदपुरीमध्ये मुख्यमंत्री आतिशी (CM Atishi) यांच्यावर सरकारी वाहनाचा निवडणुकीत प्रचारात वापर केला म्हणून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.अरविंद केजरीवाल यांनी यावर X वर प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांचे नेते सर्रास पैसे वाटतात. साडी, सोन्याची चेनही वाटप करतात. बनावट मतं तयार करतात. असे असताना एकही गुन्हा दाखल होत नाही. पण मुख्यमंत्री आतिशी (CM Atishi) यांच्याविरुद्ध मात्र तत्काळ गुन्हा दाखल होतो. आम आदमी पार्टी या सगळ्या यंत्रणेविरुद्ध लढा देत आहे. या यंत्रणेला आता जनतेला सोबत घेत बदलायचं आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्हीही पक्ष या सिस्टीमचा भाग आहेत. कालकाजी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी रिंगणात आहेत. त्यांनी सोमवारी रॅली काढली. परंतु, या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. अर्ज भरण्यासाठी उशिरा पोहोचल्याने त्यांना सोमवारी अर्ज भरता आला नाही. आता आज आतिशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यांचा अर्ज दाखल होण्याआधीच पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर आम आदमी पार्टीच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र एफआयआर का दाखल केला याचं कारणही देण्यात आलं आहे.

(हेही वाचा CM Devendra Fadnavis यांच्याकडून पानिपत शौर्य दिनानिमित्त अभिवादन)

इंडी आघाडीचा (INDI Alliance) विचार न करता ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिला आहे. समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर ठाकरेंचा पाठिंबा मिळाल्याने आम आदमी पार्टीचे बळ वाढले आहे. खासदार अनिल देसाई यांनी या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.