शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena- Uddhav Balasaheb Thackeray ) आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा एकूण ३०० जणांविरोधात विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सुनील राऊत (Sunil Raut) यांच्यावर पोलिसांच्या परवानगीशिवाय निषेध केल्याचा आरोप आहे.
( हेही वाचा : IPL vs PSL : पीएसएल ऐवजी आयपीएल निवडल्याबद्दल कॉर्बिन बॉशने मागितली पाक चाहत्यांची माफी)
घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढल्याने सरकारविरोधात विक्रोळी (Vikhroli) येथे पूर्वद्रुतगती मार्गावर बुधवारी(दि.९) शिवसेना विक्रोळी विधानसभेच्या (Vikhroli Assembly) वतीने आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांच्या नेतृत्चाखाली विनापरवाना आंदोलन करून रॅली काढली. यावेळी तेथील इमारत क्रमांक ५२ व ५३ च्या मधील चिंचोळ्या वाटेतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पूर्व द्रुतगती मार्गावर पोहोचले. यावेळी २०० ते ३०० कार्यकर्त्यांनी रस्तावर थांबून निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून हटण्याच्या सूचना केल्या. त्या सूचना कार्यकर्त्यांनी मानल्या नाही व निदर्शने सुरूच ठेवली. कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. याप्रकरणी सर्व आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार श्रीकांत मांढरे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. (Sunil Raut)
मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, या निदर्शनामुळे लोकांना मोठ्या वाहतुकीचा सामना करावा लागला. यामुळे भारतीय न्याय संहिता कलम २२३, १२६ (२) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ अंतर्गत आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांच्यासह विक्रोळी विधानसभा प्रमुख परम यादव, महिला विधानसभाप्रमुख सिद्धी जाधव, अनंत पाताडे, निलेश साळुंखे, माजी नगरसेविका रश्मी पहुडकर, आसावरी भोईटे, सिद्धी जाधव (Siddhi Jadhav), सुशिला मंचेकर, प्रिया गावडे व २०० ते ३०० कार्यकर्त्यांविरोधात विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलीस सीसी टीव्हीच्या मदतीने इतर कार्यकर्त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. (Sunil Raut)
Join Our WhatsApp Community