राहुल गांधी (Rahul Gandhi) हे कायम वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत येत असतात, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात पुराव्याशिवाय टीका करत असल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राहुल गांधी यांनी देश विरोधी वक्तव्य जाणीवपूर्वक करत असल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात ओडिशामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींविरुद्ध ओडिशाच्या झारसुगुडा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १५२ आणि १९७ (१) (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधीयांच्या देशविरोधी वक्तव्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक दुखावला गेला आहे, असे तक्रारदाराने म्हटले आहे.
(हेही वाचा दिल्लीतील भाजपाच्या दणदणीत विजयावर CM Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया; म्हणाले; दिशाभूल करणाऱ्या…)
७ फेब्रुवारी रोजी रात्री ११:३० वाजता तक्रार केल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरभळ येथील रहिवासी ४२ वर्षीय राम हरी पुजारी यांनी ही तक्रार दाखल केली. यामध्ये, झारसुगुडा जिल्ह्यातील भाजपा, भाजपा युवा मोर्चा, आरएसएस, बजरंग दल आणि भाजपा लीगल सेलच्या सदस्यांनी आरोप केला आहे की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) जाणूनबुजून देशविरोधी विधाने करत आहेत. यामुळे प्रत्येक भारतीय दुखावला आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्या आहेत, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. भारतीय राज्याविरुद्ध युद्ध घोषित करून त्यांनी जाणूनबुजून लोकांमध्ये विध्वंसक कारवाया आणि बंडखोरी भडकवली आहे. या विधानांमुळे भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता कमकुवत झाली आहे असेही म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community