उदय सामंत धमकीप्रकरणी रत्नागिरीत सहा जणांविरुद्ध गुन्हा

88

राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना जाहीर सभेत जाळून ठार मारण्याची उघड धमकी देणाऱ्या नरेंद्र जोशी यांच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सत्यजित चव्हाण, नितीन जठार, अमोल बोळे, सतीश बाणे आणि दीपक जोशी अशी अन्य सहा जणांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(हेही वाचा – आधी धमकी नंतर माफी! सामंतांना जाळून टाकू म्हणणाऱ्याने मागितली माफी; म्हणाला…)

याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक सौरभ खडपे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झालेले सर्व जण रिफायनरीविरोधी असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात गोविळ येथे यातील नरेंद्र जोशी यांनी भरसभेतच मंत्री सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. इतर आरोपींनी त्यांना चिथावणी दिली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

कोकणात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला काही लोकांचा विरोध होतोय तर काही लोकांचे समर्थन आहे. या प्रकल्पाला या रिफायनरी प्रकल्पाचे विरोधक नरेंद्र जोशी यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी दिली होती. “रिफायनरी प्रकल्प झाला तर उदय सामंत यांना जाळून टाकू”, असे म्हणत नरेंद्र जोशी यांनी उदय सामंत यांना धमकी दिली मात्र त्यानंतर नरमाईची भूमिका घेत माफी देखील मागितली.

अशी मागितली माफी

माफी मागताना जोशी म्हणाले, उदय सामंत यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले गेले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, आम्ही गुन्हेगार नाही आहोत, आम्ही गुन्हेगार नाही. आमचे म्हणणे सरकारपर्यंत पोहचत नसून सरकार आमची दखल घेत नाही. आम्हाला हा प्रकल्प नकोय, असे जोशी म्हणाले. सरकारकडून जी दडपशाही चालली आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडून जे काही शब्द निघाले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.