मलेरिया, डेंग्यू प्रमाणे सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा, तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन (Stalin Defames Sanatan Dharma) यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे प्रियांक खरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रियांक खरगे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा आहेत.
या प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात वकील हर्ष गुप्ता आणि रामसिंग लोधी यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून दोघांवर ५ सप्टेंबर या दिवशी उत्तरप्रदेशातील रामपूर येथील सिव्हिल लायन्स पोलीस ठाण्यामध्ये आयपीसीच्या कलम २९५ ए (धार्मिक भावना भडकवण्यासाठी हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि १५३ ए (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवे. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असे विखारी उद्गार काढले होते. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांनी समर्थन केले होते. याविषयी भाजपच्या नेत्यांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला होता. (Stalin Defames Sanatan Dharma)
त्यानंतर “मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे. (Stalin Defames Sanatan Dharma)
Join Our WhatsApp Community