मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकामध्ये शनिवारी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात मुंब्र्यातील शाखेवरून मुंब्रा येथे दोन्ही गटांत मोठा वाद झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शाखेला भेट देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांच्या विनंतीमुळे त्यांनी शाखेजवळ जाणे टाळले होते. यावरून “मुंब्र्यात फुसका बार आला आणि वाजलाच नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा इतका आवाज होता की त्यांना यू टर्न घ्यावा लागला.”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. यावरून ठाकरे गटाच्या कार्यकत्यांकडून अक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे उबाठा गटाचे कार्यकर्ते पालव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचा – Ind vs Aus, World Cup Final : अहमदाबादच्या खेळपट्टीची इतकी चर्चा का? )
Join Our WhatsApp Community