खासदार महुआ मोईत्रा यांच्या प्रकरणात गुरुवार २ नोव्हेंबरला आचार समितीसमोर सुनावणी आहे. मात्र तत्पूर्वी खासदार महुआ मोईत्रा यांनी व्यापारी दर्शन हिरानंदानी आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहादराय यांची उलट तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पत्र लिहून केली आहे. तसेच भाजपला माझी खासदारकी हिसकावून घ्यायची आहे, असा आरोप देखील त्यानी भाजपा वर केला आहे. (Cash For Query Case)
संसदेत प्रश्नांसाठी पैसे घेतल्याप्रकरणी खासदार महुआ मोईत्रा यांनी व्यापारी दर्शन हिरानंदानी आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहादराय यांची उलटतपासणी करण्याची मागणी केली आहे. महुआ यांनी ३१ ऑक्टोबर रोजी लोकसभेच्या आचार समितीला पत्र लिहिले होते. यात टीएमसी खासदार म्हणाल्या, हिरानंदानी आणि देहादराय यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे या दोघांची उलटतपासणी करण्याचा माझा अधिकार मला वापरायचा आहे. (Cash For Query Case)
(हेही वाचा – Ind vs Sl Preview : भारताला खुणावतेय उपांत्य फेरीतील जागा, तर चाचपडणाऱ्या श्रीलंकेची टिकून राहण्यासाठी धडपड)
कॅश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ २ नोव्हेंबरला आचार समितीसमोर हजर होणार आहेत. ३१ ऑक्टोबरला दिल्लीला रवाना होण्यापूर्वी महुआ म्हणाल्या, मी २ नोव्हेंबरला सर्व खोटे ध्वस्त करीन. मी एक रुपयाही घेतला असता तर भाजपने मला लगेच तुरुंगात टाकले असते. भाजपला मला संसदेतून निलंबित करायचे आहे. सत्य हे आहे की ते माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. आचार समितीला गुन्हेगारी अधिकार क्षेत्र नाही. त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार नाही. हे तपास यंत्रणांचे काम आहे खासगी बाबींची चौकशी करण्यासाठी आचार समिती ही योग्य जागा नाही. महुआ म्हणाल्या, २०२१ नंतर एथिक्स कमिटीची एकही बैठक झालेली नाही. समितीने अद्याप आदर्श आचारसंहिता तयार केलेली नाही. माझ्यावर काही गुन्हेगारी आरोप असल्यास तपास यंत्रणांनी तपास करावा. एथिक्स कमिटी ही एखाद्याच्या खासगी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी योग्य जागा नाही. (Cash For Query Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community