Caste Census : त्यांना हिंदू एकत्र येण्याची भीती; आशिष शेलार यांची टीका

महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्याविषयी आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.

183
Caste Census : त्यांना हिंदू एकत्र येण्याची भीती; आशिष शेलार यांची टीका
Caste Census : त्यांना हिंदू एकत्र येण्याची भीती; आशिष शेलार यांची टीका

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना जातीय जनगणनेचा विषय का नाही काढला. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आल्यानंतर हा विषय उपस्थित करण्यात येत आहे. काय हेतू आहे याचा ? मोदींच्या मागे संपूर्ण देश आहे, संपूर्ण भारतीय आहेत. आज एकत्र हिंदूंना असे वाटते की, एकत्रित राहून आपण देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे. त्यामुळे हिंदू एकत्र येतोय, याची त्यांना भीती वाटत आहे, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.

(हेही वाचा – Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्ये समावेशासाठी क्रिकेट सज्ज)

बिहारसह ४ काँग्रेसशासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्याविषयी आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस देखील जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे.

आशिष शेलार पुढे म्हणाले, ”उद्धव ठाकरे सभेत प्रश्न उपस्थित करतात की, हिंदू मोर्चे का काढत आहेत ? हा प्रश्न खरंतर एमआयएमने विचारला पाहिजे तुम्ही का विचारता ? हिंदू एकत्र आला की, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या डोक्यात प्रश्न पडायला लागतात. वाघनखांवरुन वाद हा देखील त्याचाच भाग आहे. दुकानांवरील पाट्यांवर कारवाया, आंदोलन हा त्याचाच भाग आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.