Caste Politics : जातीवर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट; टार्गेट झाले राहुल गांधी

260
Caste Politics : जातीवर जितेंद्र आव्हाडांची पोस्ट; टार्गेट झाले राहुल गांधी

भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जातीबाबत संसदेत भाष्य केले, त्याचे पडसाद देशभर उमटले. राज्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘X’ वर पोस्ट करत विरोधी पक्षनेत्याला जात विचारणे म्हणजे संसदेचा आणि संविधानाचा अवमान असल्याची ओरड केली. त्यावर नेटकऱ्यांनी राहुल गांधी यांनाच टार्गेट केले आणि जात विचारल्याशिवाय जात जनगणना कशी करणार? असा सवालही केला. (Caste politics)

संसदेचा आणि संविधानाचा अवमान

मुंब्रा मतदार संघाचे आमदार आव्हाड यांनी ‘X’ वर पोस्ट केली की, “संसदेत अत्यंत उर्मटपणे विरोधी पक्षनेत्याला त्याची जात विचारली जाते, याहून मोठा संसदेचा आणि संविधानाचा अवमान काय? भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेत जातीचा हा क्रूर अपमान झाला असावा. दिल्लीत उघडपणे हिंदू-मुस्लिम दंगल घडवण्याचा आरोप असलेला भाजप खासदार अनुराग ठाकूर याने पुन्हा एकदा त्याची आणि भाजपची बहुजनविरोधी भूमिका संसदेत मांडली. जातिनिहाय जनगणना होऊच नये आणि बहुजनांना त्यांचे हक्क मिळूच नये यासाठी हा सगळा खेळ चालुये. पण ज्या दलित, आदिवासी व मागासवर्गीयांमुळे भाजपला २४० जागा घेऊन गप्प बसावं लागलं, त्यांची जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.” (Caste politics)

तेव्हा संविधानाचा अवमान नाही झाला?

या पोस्ट वर नेटकऱ्यांनी त्यांच्यासह गांधी यांनाही मंदबुद्धी, बालकबुद्धी म्हणत धुतले. “अरे जीतूद्दीन काल तो मंदबुद्धी विरोधी पक्षनेता बजेट तयार करणाऱ्यांची जात कोणती धर्म कोणता, हे काढत होता, ते चालते का? आतापर्यंत इतिहासात कोणी बजेट बनवणाऱ्याची जात, धर्म विचारला होता का? तेव्हा संविधानाचा अवमान नाही झाला का? संविधानात लिहिले आहे का, बजेट बनवणारे कोणत्या धर्माचे असावेत?” असे प्रश्न उपस्थित केले.

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : मुंबईत आतापर्यंत १२३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी अर्ज)

बालकबुद्धी विरोधी पक्षनेता जात सगळ्यांची काढतो

तर एकाने त्यांना राहुल गांधी यांना बालकबुद्धी विरोधी पक्ष नेता म्हणून डिवचले. “तुमचा बालकबुद्धी विरोधी पक्षनेता संसदेत सर्वांची जातपात काढतो, तेव्हा तुम्हाला गोड वाटतं आणि त्याची जात विचारली तर संसदेचा अपमान संविधानाचा अपमान..??? वा.. रे.. #लाळचाटे एकिकडे जातिनिहाय जनगणना करायला सांगून सगळ्यांची जात विचारणार आणि तुमची जात विचारली तर अपमान..??? एक लक्षात ठेवा राहुल गांधी म्हणजे संविधान नाही, सोनिया गांधी म्हणजे संविधान नाही,” असे मत मांडले. (Caste politics)

काही इतर प्रतिक्रियाही बोलक्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे :

-“राहुल गांधी सगळ्याची जात विचारत फिरत असतो त्याचे काय? का त्याने रस्त्यात हागले तरी चालते आता?”

-“तुझा नेता रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्याला जात विचारत असतो. त्याला जातीय जनगणना करायची आहे. मग सुरुवात त्याची जात विचारुन केली, तर यात उर्मटपणा संसदेचा अपमान कुठुन आला. संसदेत बजेट बनवणाऱ्यामध्ये एकही SC, ST, OBC अधिकारी नव्हता, हे तो बोलु शकतो, मग त्याला त्याची जात विचारली काय चुकलं?”

-“विरोधी पक्षनेता सगळ्या देशात जात विचारत फिरतो, तेव्हा कुठे पिऊन पडलेला असता? कोणत्याही व्यक्तीला त्याची जात विचारणे हा गुन्हा आहे, हे त्या ५५ वर्षाच्या मंदबुद्धी गाढवाला समजू नये का?”

-“राहुल गांधी गाव भर SC OBC जात निहाय जनगणनेवर बोंबलत फिरतात त्याच काय…..याला म्हणतात Testing your own medicine,”

-“अरे त्याच सासंद आणि संविधानमध्ये जातिचा नावा खाली आरक्षण घेतलं ना??? तेव्हा लाज नाही वाटली का???”

-“संसदेत अत्यंत उर्मटपणे हिंदूंना जातीपातीत विभागण्यासाठी जातीगत जनगणनेची मागणी केली जाते. Shame shame!” (Caste politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.