Caste Politics : विधानसभेला जात फॅक्टर चालणार?

168
Caste Politics : विधानसभेला जात फॅक्टर चालणार?

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. महायुती आणि महाविकास आघाडीही तयार होत असून नव्या तिसऱ्या आघाडीचीही शक्यता नाकारता येत नाही. या आघाडीत आरक्षण मिळवण्यासाठी तसेच मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी मैदानात उतरलेले मराठा-ओबीसी उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Caste Politics)

मराठा समाजाची मानसिकता चाचपणी

एकीकडे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाची बाजू लावून धरण्यास सुरुवात केली असतानाच महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेले प्रहार जनाशक्तीचे बच्चू कडू यांनी मराठा समाजाची मानसिकता चाचपणी करण्यास सुरुवात केल्याचे समजते. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जात हा मुद्दा प्रभावी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (Caste Politics)

(हेही वाचा – FASTAG Updates : 1 ऑगस्टपासून फास्टॅगच्या नियमात काय होणार बदल?)

‘त्यांना’ झुलवत ठेवा

मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील २८८ जागा लढवण्याचा इशारा दिला आहेच. त्याला नव्याने उदयास आलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके, प्रकाश आंबेडकर हे हवा देण्याचे काम करत असल्याचे जाणवते. आंबेडकर यांनी जरांगे यांना निवडणूक रिंगणात उतरण्याचे आवाहन केले आहेच. तसेच काही दिवसांपूर्वी दोन्ही समाजालाही आवाहन केले की, “मराठा-ओबीसी यांनी बसून सरकारच्या विरोधात लढावे. आपापसात लढून काय होणार, मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना भूमिका स्पष्ट करा, असे पत्र पाठवून कळवले मात्र राजकीय पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. या राजकीय पक्षांना आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीपर्यंत झुलवत ठेवायचा आहे. त्यांनी आपल्याला झुलवत ठेवले तर आपणही त्यांना झुलवत ठेवायला हवे,” असे आंबेडकर म्हणाले. (Caste Politics)

शासन-जरांगे समन्वयक

प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनीही सोलापूरमध्ये बोलताना तिसऱ्या आघाडीच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केले. कडू यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला यापूर्वी पाठिंबा दिला असल्याने तसेच वेळोवेळी शासन आणि जरांगे यांच्यात समन्वयक म्हणून भूमिका बजावली आहे. त्यामुळे तिसरी आघाडी झालीच तर मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी जरांगे यांच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात कडू असल्याचे बोलले जाते. (Caste Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.