समाजात हिंदुत्वामुळे नव्हे तर ढोंगी पुरोगाम्यांमुळे विष पसरलं!

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर चॅनल्सने काढून टाकलेले फ्लॉप पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी गोखलेंच्या अभिनयाची स्तुती केली परंतु “शेवटच्या काळात ते हिंदुत्वाच्या विषाला बळी गेले होते. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, पण आजच्या दुःखाच्या दिवशी हे मतभेद मागे ठेवायला हरकत नाही.” असं म्हटलं आहे. यात त्यांनी हिंदुत्वाला विषारी म्हटलं आहे.

( हेही वाचा : क्रिकेट बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘या’ खेळाडूवर कारवाई; १ वर्ष निलंबन, भरावा लागणार लाखोंचा दंड)

निखिल वागळे यांना कदाचित विष आणि अमृत यातला फरक ठाऊक नाही. मराठीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणाले “परि अमृतातेंही पैजां जिंके” त्याचप्रमाणे हिंदुत्वाबद्दल बोलता येईल. निखिल वागळे या ढोंगी पुरोगामीत्वाचं प्रतिनिधित्व करतात, त्या ढोंगी पुरोगाम्यांनी देशात जातीयवादाचं व धर्मभेदाचं विष पसरवलं आहे. या लोकांना ज्ञानेश्वर महाराजांची देखील जात दिसते. या ढोंगी पुरोगाम्यांनी देशाचं वातावरण गढुळ आणि विषारी होईल याची व्यवस्थित काळजी घेतली.

जातीजातीमध्ये भेद नष्ट करण्यासाठी खरे पुरोगामी हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खूप मोठी क्रांती करुन ठेवली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे थोर पुरुष आपल्या देशाला लाभले आहेत. वीर सावरकर व आंबेडकरांसारख्या महात्म्यांमुळे जातीतील भेद नष्ट झाले. परंतु वागळे ज्या गटाचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी ब्राह्मणांना यथेच्छ शिव्या घातल्या, हिंदू एकसंध राहणार नाहीत यासाठी व्यवस्थित विष पेरलं. हिंदू-मुस्लिम मतभेद सदैव चालत राहतील यासाठी विशेष प्रयत्न केले. मुस्लिमांचं प्रबोधन करुन त्यांना मूळ प्रवाहात आणण्याऐवजी त्यांची माथी भडकवली आणि हिंदू समाजाला अतिरेकी घोषित केले.

बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा वागळे त्यांच्यावर टीका करत होते आणि आता तेच वागळे सभ्यपणाचा आव आणत आहेत. हिंदुत्ववाद्यांनी भारतातलं वातावरण शांत आणि संयमी ठेवलं आहे. जर देशात बहुसंख्य हिंदुत्ववादी नसते तर भारताचा पाकिस्थान झाला असता. देशात हिंदुत्ववादी बसल्यामुळे किंवा त्यांची संख्या कमी असल्यामुळे काय होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे पाकिस्तान. हा देश एक दिवस आधी स्वतंत्र झाला होता. परंतु आजतागायत हा देश भिका मागून जगतोय. तरी या ढोंगी पुरोगाम्यांना पाकिस्तानविषयी अतोनात प्रेम आहे.

निखिल वागळे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, “मी आयबीएनमध्ये असताना गोखलेंशी माझा बराच संबंध आला. त्यांची ग्रेट भेटही मी केली. He definitely deserved it.” पण वागळे यांचा इतिहास पाहता, “Respected Mr. Wagle, You definitely don’t deserved it” असं म्हणावसं वाटतं. विक्रम गोखले यांच्यासारख्या सभ्य, सज्जन आणि महान अभिनेत्याने वागळे यांच्यासारख्या पत्रकाराला मुलाखत दिली, हे गोखले सरांचं चुकलंच. किंबहुना ती त्यांची सर्वात मोठी चूक असावी असं गोखले सरांचा संपूर्ण आदर ठेवून मला प्रामाणिकपणे वाटतं.

वागळे यांच्यासारख्या ढोंगी पुरोगाम्यांचा खरा चेहरा आज जगासमोर आला आहे. सत्य, अहिंसा या त्यांच्या शब्दामागे किती मोठं विष त्यांनी लपवून ठेवलं आहे हे आता जगाला कळून चुकले आहे. हिंदुत्वाचा विजय होत आहे. आज हिंदुत्ववादी देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. म्हणून देशात शांतता नांदत आहे. पाकिस्तान घाबरून गप्प बसला आहे. हे या ढोंगी पुरोगाम्यांना बघवत नाही. म्हणून समाजात विष पसरवून वातारवण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता जनता यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही. जनता आता छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्गानेच चालणार आहे.

हिंदुत्वाचा विजय असो!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here