मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर गुरुवारी ईडीकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर आता सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या घरावर सीबीआयकडून छापेमेरी करण्यात आली होती. त्यानंतर आता अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी भोसले यांना पु्ण्यातून सीबीआयने ताब्यात घेतले आहे.
(हेही वाचाः 13 तासांनंतर परबांची चौकशी संपली, परब म्हणतात मी…)
काण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि काँग्रेसचे महाराष्ट्र राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे असून, ते एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत. तसेच चे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि राज्यातील बड्या राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते.
याआधी झाली होती छापेमारी
काही दिवसांपूर्वी ईडीकडून भोसले यांच्या निवासस्थानी तसेच मुंबईतील काही कार्यालयांवर छापेमारी केली होती. त्यानंतर अविनाश भोसले आणि त्यांचा मिलगा अमित भोसले यांची चौकशी देखील करण्यात आली होती. डीएचएफएलमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसले यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः केतकीचा तुरुंगवास वाढणार, जामीन अर्ज फेटाळला)