Delhi Transport Department च्या ६ अधिकाऱ्यांना अटक; भ्रष्टाचार व लाचखोरी प्रकरणी सीबीआयची कारवाई

33
Delhi Transport Department च्या ६ अधिकाऱ्यांना अटक; भ्रष्टाचार व लाचखोरी प्रकरणी सीबीआयची कारवाई
Delhi Transport Department च्या ६ अधिकाऱ्यांना अटक; भ्रष्टाचार व लाचखोरी प्रकरणी सीबीआयची कारवाई

भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणी सीबीआयने दि. १२ फेब्रुवारी रोजी दिल्ली परिवहन विभागाच्या (Delhi Transport Department) ६ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसातील सीबीआयची (CBI) ही मोठी कारवाई आहे.

( हेही वाचा : Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून मिचेल स्टार्क बाहेर, स्टिव्ह स्मिथ करणार ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व)

दिल्‍लीच्या (Delhi) परिवहन विभागातील भ्रष्टाचाराविरुद्ध सीबीआयकडे (CBI) तक्रारी आल्‍या होत्‍या. संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईपूर्वी तक्रारींचे पडताळणी करण्‍यात आली. तक्रारींची पडताळणी करताना विविध पातळ्यांवर भ्रष्टाचार झाल्‍याचे प्राथमिक माहिती मिळाली.यानंतर सीबीआयने परिवहन विभागाच्‍या 6 अधिकाऱ्यांना अटक केली. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते उदित राज म्हणाले की, यापूर्वीचे आम आदमी पार्टीचे सरकार भ्रष्ट होते. जल बोर्ड घोटाळा (Jal Board scam), कॅग अहवाल (CAG Report), दारू घोटाळा (Liquor scam) असे अनेक घोटाळे या सरकारच्‍या काळात झाले. आता भाजपचे सरकार आले आहे. नवीन सरकार प्रत्यक्षात भ्रष्‍टाचाराविरोधात कोणती कारवाई करते ते पाहूया असे उदित राज म्हणालेत.

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.