राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात फासे आवळले आहेत. आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर शिवसेनेचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब हे आले आहेत. या दोधांच्या सीबीआय चौकशीची मागणी सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली.
देशमुखांनंतर परब तुरुंगात जाणार!
काही दिवसांत अनिल देशमुख यांना अटक होणार आहे, इतकेच नव्हे तर देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांचीही अवस्था होणार असल्याचे सोमय्या म्हणाले. अनिल परब नंतर मिलिंद नार्वेकरांनाही परबांच्या वाटेवर जावे लागणार आहे. मिलिंद नार्वेकरांनी दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब यांच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. या बंगल्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाडे कापली. आज त्या जागेची किंमत १० कोटी आहे, दोन मजली बंगल्याचे बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला मार्गदर्शन पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरेंचे आहे. कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी घेतली नाही. अनिल परब यांच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जात असतात व मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात, आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे घेतात, असा देखील आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
(हेही वाचा : ‘तो’ मौलवी निघाला अब्जावधी! धर्मांतरासाठी शाळकरी हिंदू मुलांना नमाज पढायला सांगायचा! )
शिवसेना बंगलो पार्टी!
एका बाजुला उद्धव ठाकरे कागदावर १९ बंगलो उभे करतात, दुसऱ्या बाजुला मिलिंद नार्वेकर २५ कोटींचा बंगला बांधतात, तर तिसऱ्या बाजुला अनिल परब यांनी रिसॉर्ट तर बांधला पण रिसॉर्टच्या बाजुला अनिल परब यांचा बंगला देखील आहे. शिवसेना ही बंगलो पार्टी झाली आहे, आणि म्हणून आमची मागणी आहे. या सगळ्या शिवसेना नेत्यांच्या बंगल्यांची उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांसाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी. असेही सोमय्या म्हणाले.
Join Our WhatsApp Community