राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर सोमवारी सीबीआयची छापेमारी सुरू आहे. सीबीआयने क्लीनचिट दिल्याचा अहवाल लिक झाल्याप्रकरणात ही छापेमारी सुरू आहे. या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांचे वकील आणि सीबीआयच्या एका अधिकाऱ्याला अटक केली होती. सीबीआयने देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केला, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र सीबीआयचे प्रवक्ते यांनी याला दुजोरा दिलेला नाही.
सीबाआयकडून ही कारवाई होत आहे, याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नव्हती. गेल्या महिन्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख यांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड टाकली होती. नागपुरातील मिडास बिल्डिंगमधील साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती केली. या कारवाई दरम्यान इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपाएफचे पथक सुद्धा उपस्थित होते.
(हेही वाचा : काकांचं दुःख सतावत आहे, त्याचंच तुम्हाला पित्त झालंय)
कारवाईच्या विरोधात एनसीपीची निदर्शने
दरम्यान या कारवाईच्या विरोधात एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी देशमुखांच्या बंगल्यासमोर निदर्शने करत या कारवाईचा विरोध केला. या कारवाईच्या संदर्भात बोलताना एनसीपीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी हा नारी शक्तीचा अवमान आहे, असे देशमुखांच्या सूनेविरोधात जारी केलेल्या वॉरंटसंबंधी म्हणाल्या.
कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त
दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली होती. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना हा एक मोठा झटका आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे.
Join Our WhatsApp Community