राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पटणा येथील घरी सोमवारी सीबीआयने धाड टाकली आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणी सीबीआयने यापूर्वीच लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मिसा भारतीसह १४ जणांना १५ मार्च रोजी समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान जेव्हा सीबीआय धाड टाकली तेव्हा राबडी देवी विधान परिषदेत जाण्याच्या तयारीत होत्या.
दरम्यान राजद समर्थकांचे म्हणणे आहे की, ‘लालू प्रसाद नुकतेच सिंगापूरवरून परतले आहेत. त्याची राजकारण थोडीशी सक्रियता वाढली आणि एका कार्यक्रमात त्यांनी संबोधित केले. तेव्हापासून केंद्र सरकार घाबरले आहे. बिहारमध्ये सर्व लोकं होळीच्या तयारीत असताना भाजपने सीबीआय पथकाला पाठवले आहे. तपास यंत्रणाचा हा दुरुपयोग केला जात आहे. २०२४च्या निवडणुकीत जनता याला चोख प्रत्युत्तर देईल.’
१४ वर्ष जुन्या प्रकरणात लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबियांनी जमिनीच्या बदल्यात ७ जणांना रेल्वेत नोकरी दिल्याचा आरोप आहे. त्यापैकी ५ जमिनीची विक्री झाली होती, तर २ लालू यादव यांना भेट म्हणून देण्यात आल्या होत्या.
(हेही वाचा – काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या)
Join Our WhatsApp Community