सीबीआयने परमबीर सिंग यांच्यासह चार जणांचे नोंदवले जबाब!

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एनआयए कार्यालयात जाऊन सचिन वाझे याच्याकडे १०० कोटी संदर्भात चौकशी करून त्याचा जबाब नोंद करून घेतला.

तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या १०० कोटींच्या लेटरबॉम्बप्रकरणी सीबीआयकडून गुरुवारी परमबीर सिंग, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्यासह चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतून महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला आहे.

१५ दिवसांत न्यायालयात अहवाल सादर करण्याची सूचना

या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी ऍड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) चौकशीचे आदेश देऊन १५ दिवसांत न्यायालयात अहवाल सादर करण्यात यावा, अशी सूचना केली होती. यासदर्भात सीबीआयने बुधवारी एनआयए न्यायालयाकडून या संदर्भात सचिन वाझे याचा जबाब घेण्यासाठी परवानगी मागितली होती.

(हेही वाचा : …तर मुंबईत शनिवारपासून लसीकरण पूर्णपणे ठप्प!)

जयश्री पाटील यांचाही जबाब नोंदवला!

एनआयए न्यायालयाने सीबीआय परवानगी दिल्यानंतर गुरुवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एनआयए कार्यालयात जाऊन सचिन वाझे याच्याकडे यासंदर्भात चौकशी करून त्याचा जबाब नोंद करून घेतला आहे. तसेच वाझे याच्या लेटरबॉम्बबाबत देखील त्याच्याकडे विचारणा करण्यात आली असल्याचे समजते. वाझे याच्या जबाबानंतर सीबीआयने तत्कालीन पोलीस आयक्त परमबीर सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि ऍडव्होकेट जयश्री पाटील यांचे देखील जबाब नोंद केले असल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here