Phone Tapping Case: ‘ईडी’च्या कोठडीत असलेले संजय पांडे आता ‘सीबीआय’ कोठडीत

136

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंगप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. त्यामुळे ईडीच्या कोठडीत असलेल्या पांडे यांचा ताबा आता सीबीआयने घेतला आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवासंची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. पांडे यांच्या विरोधात पुरावे असल्याचे यावेळी न्यायालयाने म्हटले आहे.

(हेही वाचा – व्हिडिओ कॉल वरून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई गुन्हे शाखेकडून तरूणाला बेड्या)

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कर्मचाऱ्यांचे अवैधरीत्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी ईडीने संजय पांडे यांना १९ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर, आता शनिवारी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील न्यायालयाने पांडे यांचा ताबा सीबीआयला देण्याची अनुमती देत पांडे यांना चार दिवस रिमांडमध्ये ठेवले आहे. ८ जुलै रोजी सीबीआयने केलेल्या छापेमारीमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पांडे यांच्या कंपनीतून सर्व्हर, २५ लॅपटॉप, काही डेस्कटॉप संगणक ताब्यात घेतले होते.

दरम्यान,  २००९ ते २०१७ या राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे अवैधरीत्या फोन टॅपिंग झाल्याचे उघडकीस आले होते. याच प्रकरणात सीबीआयने ८ जुलै रोजी संजय पांडे यांचे निवासस्थान तसेच कार्यालयांवर छापेमारी केली होती. तसेच संजय पांडे, त्यांच्या कंपनीचे सध्याचे संचालक संतोष पांडे (संजय पांडे यांची आई), अरमान पांडे (संजय पांडे यांचा मुलगा) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.