राज्यात मराठीमय वातावरण तयार करा! मनसेचे आवाहन…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

193

कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत, आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव दिवसही जोरदार, दिमाखात साजरा झाला पाहिजे. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने राज्यभरात मराठीमय वातावरण निर्माण करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

मनसेचे आवाहन

राज ठाकरे यांनी आता मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहून मराठी भाषा दिन उत्साहाने साजरा करण्यास सांगितले आहे. मराठी भाषेने आपल्याला मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले आहेत. अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमाने, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा असे आवाहन मनसेने केले आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

Marathi Bhasha

( हेही वाचा : काँग्रेसच्या मोर्चाचा मनोज कोटकांच्याही घरासमोर फियास्को )

मराठी भाषेचे पावित्र्य राखत, विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करा, कार्यक्रम इतक्या जोरदारपणे साजरे करा की, तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिचे की, आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. असे आवाहन मनसेने परिपत्रक जारी करत समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेला केले आहे. तसेच संपूर्ण राज्यात मराठी दिनानिमित्त मराठीमय वातावरण निर्माण करा असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.