बेळगावात मराठी भाषिकांचा पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा आरोप

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा ६० वर्षे लढा सुरु आहे. तेथील महापालिका आतापर्यंत मराठी माणसाच्या ताब्यात होती, आता या निवडणुकीत मराठी भाषिकांचा पराभव घडवून आणला आहे. समितीमध्ये फाटाफूट करण्यात आली, चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना केली, ८ वर्षे महापालिकेवर प्रशासक नेमला अचानक निवडणूक जाहीर केली, प्रचारासाठी तयारी करायला वेळ मिळू दिला नाही, अशा प्रक्रारे त्या ठिकाणी मराठी भाषिकांचा पराभव घडवून आणण्यात आला, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

१०५ हुतात्म्यांचा अपमान

सीमा बांधवांचा महाराष्ट्रात येण्यासाठी लढा सुरु आहे, त्यांना मदत म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्या ठिकाणी कधीच निवडणूक लढवली नाही. तेथील महाराष्ट्र एकीकरण समितीला आम्ही पाठिंबा देत असतो. मात्र या ठिकाणी महापालिका निवडणुकीत एकीकरण समितीचा पराभव झाला, त्यामुळे महराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी पेढे वाटले हा १०५ हुतात्म्यांचा अपमान आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.

(हेही वाचा : …तर यापुढे कोरोनाची ‘महाराष्ट्र सरकार व्हायरस’ ओळख! मनसेचा टोला)

फोडाफोडी राजकारण करून पराभव!

बेळगावात मराठी भाषिक लाठ्या खातात, ६० वर्षे लढा देत आहेत, अशा वेळी त्यांचा पराभव झाल्यावर महाराष्ट्रात काही जण पेढे वाटतात, जेव्हा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अटक केल्यावर महाराष्ट्र शोक सागरात बुडाला होता, तेव्हाही इथे काही जणांना आनंद झाला होता, तसा आनंद यावेळी काही जणांना झाला आहे, असेही राऊत म्हणाले. या निवडणुकीत भाजपाने १५ मराठी भाषिक उमेदवारांनी निवडून आणल्याचा दावा केला आहे. त्याविषयी आपल्याला काही बोलायचे नाही, हे १५ जण फोडाफोडी करूनच निवडून आणले आहेत, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here