देशात आता जनगणनेस सुरुवात होणार आहे; परंतु जनगणनेचे चक्र बदलणार आहे. नेहमी दहा वर्षांनी होणारी जनगणना यंदा १४ वर्षांनी होणार आहे. २०११ नंतर आता २०२५ मध्ये जनगणना होणार असून त्यानंतर २०३५, २०४५, २०५५ अशी पुन्हा दहा दहा वर्षांनी जनगणना होणार आहे.
यापूर्वी १९९१, २००१, २०११ अशी जनगणना झाली होती. आता २०२५ मध्ये होणाऱ्या या जनगणनेमध्ये संप्रदायाची माहिती घेतली जाणार आहे. २०२१ मध्ये कोरोनामुळे जनगणना झाली नवहती. पण या जनगणनेत जातीय जनगणना होणार का? या संदर्भात कोणताच खुलासा अजून झालेला नाही. अनेक विरोधी पक्षांकडून जातीय जनगणनेची मागणी होत आहे. (Census in India)
(हेही वाचा – Assembly Elections 2024 : बंडोबांना केले जाईल थंड की मैत्रीपूर्ण या गोंडस नावाखाली सर्वकाही सामावून जाईल ?)
मात्र, सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. या वेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत हे देखील विचारले जाऊ शकते. जनगणनेत यंदा संप्रदाय विचारला जाणार आहे. जसे कर्नाटकात सामान्य वर्गात असलेले लिंगायत समाज स्वतःला वेगळा संप्रदाय मानतात. तसेच अनुसूचित जातीत वाल्मीकी, रविदासी सारखा संप्रदाय आहे. म्हणजेच आता धर्म, वर्ग सोबत संप्रदाय गणनेचा आधार असणार आहे. त्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. (Census in India)
जातीय जनगणना होणार का?
२०२६ मध्ये जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होणार आहे. त्यानंता हे काम २०२८ पर्यंत पूर्ण सोण्याची शक्यता आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि एनडीएमधील (NDA) काही पक्षांनी जातीय जनगणनेची मागणी केली आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. (Census in India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community