शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज करून या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानुसार सोमवार, १२ डिसेंबर हा दिवस ठाकरे गटासाठी महत्वाचा होता. या दिवशी सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता होती, परंतु आयोगाने ही सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेथून पुढे दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून निर्णय देईपर्यंत ज्या आगामी निवडणुका होतील, त्या ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्हावरच लढवाव्या लागणार आहे.
५ मिनिटांतच आयोगाने काम संपवले
यावेळी बोलतात ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर सोमवारी युक्तिवाद झालाच नाही. त्यावेळी आयोगाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेण्यात येईल, तेव्हा ज्या ज्या गोष्टी समोर येतील, त्यानुसार युक्तीवाद होईल, असे आयोगाने सांगितल्याचे खासदार देसाई म्हणाले. केवळ ५ मिनिटातच आयोगाने काम संपवले. आजच्या दिवशी आयोगाने ठाकरे गटाने सादर केलेले कागदपत्रे यांची छाननी करून त्यात किती तथ्य आहे हे पाहील, अशी अपेक्षा होती, असे खासदार देसाई म्हणाले.
(हेही वाचा हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख)
Join Our WhatsApp Community