शिवसेनेच्या ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ११ लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे शिवसैनिकांकडून जमा करून आघाडी घेतली. असे असले तरी त्यापैकी दोन ते अडीच लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाच्या विहित नमुन्यात नसल्याने निकामी ठरणार आहेत. तरीदेखील साडेआठ प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला यश मिळाले आहेत.
(हेही वाचा – माथेरानसह ‘या’ ७ स्थानकांवर लवकरच सुरू होणार ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’)
आपलीच शिवसेना खरी असा दावा सिद्ध करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांकडून पाठिंबाची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात आघाडी घेतली जात असली तरी ती आयोगाच्या विहित नमुन्यात नसल्याने तब्बल अडीच लाख अर्ज निरुपयोगी ठरले आहेत.
दरम्यान, ठाकरे गटाने साडेआठ लख सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे आयोगाच्या दिल्ली कार्यालयात पाठविली आहेत. तर प्रत्यक्षात ११ लाख प्रतिज्ञापत्रे तयार करण्यात आली होती. मात्र आयोगाने ती बाद केली असती म्हणून ही प्रतिज्ञापत्र ठाकरे गटाने आयोगाला पाठविलीच नाहीत. अशातच यापूर्वी ठाकरे गटाने जमा केलेल्या अडीच लाख प्रतिज्ञापत्रांत साडेचार हजार प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याची तक्रार शिंदे गटाने केली आहे. या तक्रारीनंतर ठाकरे गटाकडून यापुढील प्रतिज्ञापत्रे काळजीपूर्वक तपासूनच आयोगाकडे पाठवत आहे.
Join Our WhatsApp Community