लवकरच मध्यवर्ती निवडणुका होणार, गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका; राऊतांचे विधान

103

राज्यातील राजकीय नाट्यानंतर, सत्तेत आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारची 4 जुलैला खरी कसोटी आहे. अधिवेशनाचा 4 जुलैला दुसरा दिवस आहे. या दिवशी बहुमत चाचणी पार पडणार आहे. त्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लवकरच महाराष्ट्रात मध्यवर्ती निवडणुका होणार असल्याचे सांगितले. तसेच भाजपने केलेली ही तात्पुरती तजवीज आहे. गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका होऊ शकतात, अशी माझी माहिती आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

शिवसेना म्हणजे युक्रेन नाही

शिवसेनेला तोडण्याची भाषा करणा-यांना खासदार संजय राऊत यांनी थेट सुनावले. शिवसेना म्हणजे युक्रेन नाही. कोणताही गट शिवसेनेला अशा प्रकारे ताब्यात घेऊ शकत नाही. विधीमंडळात शिवसेना कमजोर झाली असेल, पण महाराष्ट्राच्या गावा- गावात, शहरा- शहरात शिवसेना मजबुतीने उभी आहे, असे राऊतांनी सांगितले.

( हेही वाचा: बाबा शिवसैनिकांना GPS Tracker बांधूया; प्रतिज्ञापत्रावरुन मनसेचा शिवसेनेला खोचक टोला )

इरादे पूर्ण होणार नाहीत

 अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलो आहोत हा पक्ष पुन्हा पुन्हा फोडण्याचा प्रयत्न होतो आणि त्यातून शिवसेना उभी राहते. जोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना मजबुतीने उभी आहे, तोपर्यंत दिल्लीचे जे इरादे आहेत, मराठी माणसाच्या हातून महाराष्ट्र तोडण्याचे, मुंबई तोडण्याचे, ते त्यांना शक्य नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.