भारतात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ऑनलाइन गेमिंग (Online Gaming) कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांनी परदेशातून कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग कंपन्यांच्या 357 वेबसाइट ब्लॉक केल्या. यासोबतच सुमारे 2,400 बँक खातीही जप्त करण्यात आली आहेत. (Online Gaming)
हेही वाचा-सुनीता विल्यम्स यांना Donald Trump ओव्हरटाइम पगार देणार !
मंत्रालयाने लोकांना अशाप्रकारच्या गेमिंग प्लॅटफॉर्ममध्ये सामील होण्यापासून सावध केले. मंत्रालयाने म्हटले की, बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनी या प्लॅटफॉर्मची जाहिरात केली, तरी तुम्ही याच्या भरीस पडू नका. जवळपास 700 विदेशी ई-गेमिंग कंपन्या DGGI च्या रडारवर आहेत. याचे कारण म्हणजे, त्यांनी यासाठी कुठलीही नोंदणी केलेली नाही. तसेच, या कंपन्यांकडून GST ची चोरीही केली जात आहे. (Online Gaming)
हेही वाचा- Bareilly मध्ये भट्टीतून विटा काढताना भिंत कोसळली, ४ कामगारांना वाचवण्यात यश, उर्वरितांचा शोध सुरू
या विदेशी कंपन्या बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून व्यवहार करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, DGGI ने एकूण 2,400 बँक खाती जप्त केली आणि सुमारे 126 कोटी रुपये गोठवले आहेत. (Online Gaming)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community