केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : नारायण राणे दिल्लीला रवाना!

नारायण राणे यांच्याकडे शिवसेनेला याआधी दिलेले अवजड खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील महिनाभरापासून मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची नुसतीच चर्चा ऐकिवात येत होती, अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. त्यासाठी नारायण राणे हे दिल्लीला रवाना  झाले आहेत. नारायण राणे सायंकाळी दिल्लीत पोहचणार आहे. सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या निवासस्थानी जावून भेट घेणार आहेत.

प्रीतम मुंडेंनाही मंत्रीपद मिळणार!

केंद्रीय मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार याची कमालीच उत्सुकता राजकीय नेत्यांना लागली आहे. महाराष्ट्रातून खासदार प्रीतम मुंडे आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राणे यांच्याकडे शिवसेनेला याआधी दिलेले अवजड खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा : फोन टॅपिंग करायला लावणारा मुख्य सूत्रधार कोण?: नाना पटोले)

शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न! 

मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, शिवसेना एनडीएमध्ये असताना अवजड खाते हे शिवसेनेला देण्यात आले होते. अवजड खात्यावरून शिवसेनेने राजी व्यक्त केली होती. २०१४ मध्येही शिवसेनेकडे अवजड उद्योग मंत्रालय होते. त्यावेळी अनंत गीते हे केंद्रात शिवसेनेचे मंत्री होती. पण, अनंत गीते यांचा रायगडमधून पराभव झाल्यावर अरविंद सावंत यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. २०१९ मध्ये मात्र शिवसेनेने युती तोडून एनडीएतून बाहेर पडली. त्यामुळे सेनेला डिवचण्यासाठी सेनेचा कट्टर शत्रू नारायण राणे यांना सेनेलाच दिलेले खाते देण्यात येईल, अशी शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here