जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलींगमुळे सध्या हिंदू लोकांची दहशतवाद्यांकडून हत्या केली जात आहे. या टार्गेट किलींगमुळे सध्या दहशत पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिन्यातच ४० नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधून अनेक भारतीय नागरिकांनी पलायन कऱण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षं निषेध व्यक्त करत असून मनसेने देखील आक्रमक होत संताप व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – LPG Subsidy: … तरच मिळणार घरगुती गॅस सिलिंडरवर ‘सबसिडी’, ‘या’ लोकांनाच मिळणार दिलासा)
काय केलं संदीप देशपांडेंनी ट्विट
शुक्रवारी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्विट केल्याचे पाहायला मिळाले. जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या हत्यांचा निषेध करत संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे”.
ज्या पद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसच बंदुका आणि ते चालवण्याच प्रशिक्षण केंद्र सरकारने दिल पाहिजे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 3, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ४० नागरिकांची हत्या केली आहे. कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याचीही हत्या केली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी दिल्लीत जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत काश्मीर खोऱ्यातल्या सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला गृह मंत्रालय, लष्कर आणि राज्य सुरक्षा यंत्रणांचे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community