शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांद्यावरील Export Duty बाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांद्यावरील Export Duty बाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

57
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांद्यावरील Export Duty बाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांद्यावरील Export Duty बाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क (Export Duty) हटवले आहे. 1 एप्रिल पासून निर्यात शुल्क शून्य टक्के होणार आहे. या निर्णयामुळे कांदा निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. (Export Duty)

हेही वाचा-Jayant Patil भाजपात की अजित पवारांच्या NCP मध्ये प्रवेश करणार?

उन्हाळी कांदा बाजारात येणार असल्याने येत्या काळात आणखी भाव खाली जाण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, अशातच केंद्र सरकारच्या या निर्णययाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत. (Export Duty)

हेही वाचा- World Climate Day : पर्यावरणाविषयी जागृती नसणे हेच आश्चर्यकारक !

केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर संपूर्णत: मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचा अत्यंत आभारी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (Export Duty)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.