“कोण अजित पवार? मी नाही ओळखत”, नारायण राणेंचा हल्लाबोल

132

आमदार नितेश राणे यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहत म्याव म्याव असा मांजरीचा आवाज काढला. त्यानंतर त्यावर राज्यातील राजकारणात चांगलेच तापले. यावेळी नारायण म्हणाले, विधानभवन परिसरात अशा प्रकारे आमदारांनी वर्तवणूक करू नये, आपण कुत्रे, मांजरासारख्या प्राण्यांचे प्रतिनिधित्व करत नाही, हे लक्षात ठेवावं असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणेंना लगावल्यानंतर त्यावर नारायण राणेंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नारायण राणे

नारायण राणेंनी अजित पवारांनी विधानसभेत मांडलेल्या भूमिकेवर देखील टीका केली आहे. पत्रकारांनी पवारांनी विधानसभेत मांडलेल्या भूमिकेबाबात विचारणा केली असता, ”’कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना… राज्यातील लोकांच्या कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. कोकणात पूर, नैसर्गिक वादळ आले तेव्हा अजित पवार कुठे होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  त्याबाबत संदर्भ का देत नाहीत तुम्ही?” असा उलट प्रश्न त्यांनी अजित पवारांना केला आहे.

मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा

कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले, विधिमंडळात नितेशनं म्यॉव म्यॉव केलेलं नाही. तो काही असंसदीय शब्द नाही. मग तुमची हरकत काय आहे. आदित्य ठाकरे हे सभागृहात जात असताना नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन करताना मांजरीचा आवाज काढला होता. नितेश यांच्या कृतीला नारायण राणे यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले. आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध असा सवालही त्यांनी केला. मांजरीचा आवाज काढला राग का यावा, असा उलट सवालही करत वाघाची मांजर कधी झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर पुढे ते म्हणाले,  पंतप्रधानांवर कोण बोललं तर ऐकून घेणार नाही, नक्कल केली तर सेम उत्तर देऊ, आमच्यातही नकलाकार आहेत, असे नारायण राणे यांनी ठणकावून सांगितले. तर भास्कर जाधव हे नाचे असल्याचे म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका केली.

(हेही वाचा – “अभ्यास करुन अजीर्ण झालं असेल तर राज्याचं आरोग्य खातं सक्षम आहे”, राऊतांचा राज्यपालांना टोला)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.