महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत घेण्यात येईल, अशी जोरदार चर्चा होती. त्या चर्चेला पूर्ण विराम देत या निवडणूका वेळेवरच घेण्यात येईल, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले.
(हेही वाचा – Varkari : वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा)
पियुष गोयल म्हणाले की, केंद्र सरकारला कोणतीही घाई नसून राज्यातील विधानसभा निवडणुका ठरलेल्या वेळीच घेण्यात येईल. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला निवडणुकीची कोणतीही घाई नाही. ज्यांना निवडणुकीची घाई असेल त्यांनीच निवडणूक घ्याव्यात असा टोमणा विरोधी पक्षाला मारायलाही ते विसरले नाहीत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक वेळेपूर्वी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोग आतापासून कामाला सुरुवात करील. पण निवडणूक कधी घ्यायची ठरविण्याचा अधिकार त्यांचा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community