आपल्या विधानासाठी नेहमी चर्चेत असणारे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर, राजकीय घडामोडींना पुर्णविराम लागेल अशी शक्यता होती. परंतु राजकीय घडामोडी काही थांबलेल्या नाहीत. महाराष्ट्रातले सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज नवे आरोप केले जात आहेत. त्यातील एक म्हणजे शिवसेना शरद पवारांनी फोडली. आता याच आरोपावर रामदास आठवले यांनी शिवसेना संजय राऊतांनी फोडल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांना राष्ट्रवादीत जायचे असल्याने, त्यांनी भाजप शिवसेनेची युती तोडली, असं वक्तव्य आठवले यांनी केले आहे.
( हेही वाचा: उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना कॉल; इगो संपल्यामुळे की इगो वाढल्यामुळे? )
काय म्हणाले रामदास आठवले?
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी युती केली आहे. शिवसेना फोडणारे शरद पवार नसून, संजय राऊत होते. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी काॅंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा देखील आरोप आठवले यांनी राऊतांवर केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली नसती तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच सरकार आले असते असे देखील आठवले म्हणाले.
Join Our WhatsApp Community