Central Vista : राजदंडापुढे पंतप्रधान मोदींचा दंडवत

सरकारने या संसदेची झलक दाखवणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या नवीन इमारतीचे (Central Vista) उद्घाटन दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

262
Central Vista : Central Vista : राजदंडापुढे पंतप्रधान मोदींचा दंडवत

देशाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या आणि देशहिताचे निर्णय घेणाऱ्या संसदेच्या (Central Vista) नविन इमारतीचे उद्घाटन आज म्हणजेच २८ मे, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar Jayanti 2023 : वीर सावरकर : शिवरायांचा निष्ठावंत मावळा)

यापूर्वी सरकारने या संसदेची झलक दाखवणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या नवीन इमारतीचे (Central Vista) उद्घाटन दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. उद्घाटन कार्यक्रमापूर्वीचे विधी सकाळी संसदेतील गांधी पुतळ्याजवळ पार पडत आहे.

अशातच पंतप्रधान मोदींनी उद्घाटनापूर्वी संसद भवन (Central Vista) बांधणाऱ्या मजुरांचे आभार मानले, तसेच त्यांना सन्मानित देखील केले. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात राजदंड स्थापित केला असून त्यांनी यावेळी फलकाचे अनावरणही केलं आहे. तसेच मोदींनी सेंगोलला साष्टांग दंडवत घालून नमस्कार केला. तसेच नवीन संसद भवनात (Central Vista) आयोजित ‘सर्व-धर्म’ प्रार्थना समारंभात देखील पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि कॅबिनेट मंत्री सहभागी झाले.

हेही पहा – 

येथे (Central Vista) वापरले जाणारे सागवान लाकूड नागपुरातून आणले आहे. लाल-पांढरे वाळूचे खडे राजस्थानमधील सर्मथुरा येथून आणले आहेत. लाल किल्ला आणि हुमायूंच्या थडग्यातही हे खडेवापरण्यात आले. भगवा हिरवा दगड उदयपूर येथून, लाल ग्रॅनाइट अजमेरजवळील लाखा येथून आणि पांढरा संगमरवरी राजस्थानातील अंबाजी येथून आणला गेला आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या चेंबर्समध्ये फॉल्स सिलिंगसाठी स्टील स्ट्रक्चर दमण-दीव येथून खरेदी करण्यात आले आहे. फर्निचर मुंबईत बनते. राजस्थानातील राजनगर आणि नोएडा येथून दगडी जाळीचे काम करण्यात आले. गेला. अशोक चिन्हासाठी साहित्य महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानमधील जयपूर येथून मागवण्यात आले होते. दुसरीकडे, भिंतीवरील अशोक चक्र मध्य प्रदेशातील इंदूर येथून आणण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.