पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी दुपारी 12 वाजता नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. या दरम्यान संसदेत सेंगोल (राजदंड) ही ठेवण्यात येणार आहे. राजदंड हा एक प्रकारचे शक्ती हस्तांतरणाचे प्रतीक आहे. संसद भवनात अध्यक्षांच्या खुर्चीजवळ राजदंड ठेवण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांकडून राजदंड घेतला होता. राजदंड तामिळनाडूतून मागवण्यात आला होता. आता ते प्रयागराज येथील संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे प्रतिबिंब असेल. जेव्हा पीएम मोदींना राजदंडाबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी याबद्दल अधिक माहिती घेण्यास सांगितले. 14 ऑगस्ट 1945 रोजी 10:45 च्या सुमारास नेहरूंनी ब्रिटीशांकडून राजदंड स्वीकारला होता. मात्र, 1947 नंतर राजदंडाचा विसर पडला, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. नंतर २४ वर्षांनंतर एका तमिळ विद्वानाने त्यावर चर्चा करून पुस्तकात उल्लेख केला. 2021-22 मधील सरकारी आकडेवारीत याचा उल्लेख आहे. 1947 मध्ये त्या वेळी उपस्थित असलेले 96 वर्षीय तमिळ विद्वान राजदंडाच्या स्थापनेच्या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहितीही अमित शहा यांनी दिली.
Join Our WhatsApp Community