ओमिक्राॅनचा धोका! राज्याच्या निर्बंधांवर केंद्राचा आक्षेप

117

ओमिक्राॅन या विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत अलर्ट असून, बाहेरुन भारतात येणा-या प्रवाशांसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. पण या ओमिक्राॅनच्या धोक्यासंबंधी महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बाहेरुन महाराष्ट्रात येणा-या प्रवाशांना 14 दिवस गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक केले, सोबतच आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असे कडक निर्बंध लावले आहेत. आता यावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे. राज्याने केंद्राच्या नियमांशी सुसंगत अशी नियमावली बनवावी. अशा सूचना केंद्राने राज्याला दिल्या आहेत.

केंद्राचा आक्षेप

ओमिक्राॅन विषाणूचा धोका लक्षात घेता राज्याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 14 दिवस गृहविलगीकरण बंधनकारक केले आहे. तसेच इतर राज्यातून महाराष्ट्रात येणा-या प्रवाशांना 48 तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. महाराष्ट्र राज्यांच्या या कडक निर्बंधांवर केंद्राच्या आरोग्य विभागाने आक्षेप घेतला आहे.

सुसंगत नवीन नियमावली करा

महाराष्ट्र राज्याचे हे निर्बंध देशभरासाठी केंद्राच्या आरोग्य विभागाने केलेल्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने केंद्राने लागू केलेल्या नियमावलीशी सुसंगत नवीन नियमावली तयार करावी आणि त्यास व्यापक प्रसिद्धी द्यावी,असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

 ( हेही वाचा: आजही राज्यात पाऊस बरसणार, हवामान खात्याकडून येल्लो अलर्ट! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.