छगन भुजबळांकडून देवी सरस्वतीची विटंबना, म्हणाले…

148

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भाषणात जीभ घसरली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमामधील भुजबळांच्या भाषणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी चक्क सरस्वती देवीची विटंबना केली. त्यामुळे भुजबळ वादात सापडले आहेत. त्यांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून होऊ लागली आहे. तर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही याप्रकरणी भुजबळांनी क्षमा मागावी अशी मागणी होत आहे.

काय म्हणाले भुजबळ? 

आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असे विधान केले. मात्र यावेळी त्यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिले नाही. जिने आम्हाला काही शिकवले नाही. असेलच शिकवले तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवले आणि आम्हाला दूर ठेवले तर त्यांची पूजा कशासाठी करायची? मला काही कळत नाही. अरे ज्यांनी तुम्हाला दिले ते हे सगळे इथे आहेत, असे भुजबळ यांनी मंचावरील महापुरुषांच्या फोटोंकडे पाहत म्हटले. यांच्यामुळेच तुम्हाला शिक्षण मिळाले. अधिकार मिळाले आणि सगळे मिळेल. यांची पूजा करा हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव समजून यांची पूजा झाली पाहिजे. यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे. बाकीचे देव-बीव आहेत ते नंतर बघूयात, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा धक्का, पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच)

भाजपाचा हल्लाबोल

भुजबळ यांच्या या भाषणाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने त्यावर आक्षेप घेतला आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी भुजबळांनी हे विधान मागे घ्यावे अशी मागणी केली. हिंदू देवींचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन आता भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेत भुजबळ यांनी माफी मागून आपले विधान मागे घ्यावे, असे म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.