राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची (State Commission for Backward Classes) पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. सुनील शिक्रे यांची नियुक्ती केली आहे. तसेच सदस्य पदाच्या रिक्त जागांवर ओमप्रकाश जाधव, मारुती शिंगारे, मच्छिन्द्रनाथ तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढल्यानंतर सरकार दरबारी हालचालींना वेग आला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी या समाजाचे मागासलेपण सिद्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्वेक्षण करण्याची विनंती राज्य सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाकडे (State Commission for Backward Classes) करण्यात आली होती. मात्र आमच्या कामकाजात सरकारमधील काही घटक हस्तक्षेप करत असल्याचे सांगत आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता. तसेच काही दिवसांपूर्वी आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता अखेर राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
Join Our WhatsApp Community