राज्याच्या राजकारणात मोठी उलथापलथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. अशातच राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्याता असल्याचे भाकीत उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी दिली.
(हेही वाचा- BMC निवडणुकीसाठी ‘भाजपा’ने कंबर कसली! ‘मातोश्री’च्या अंगणात ‘जागर…’)
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. तर आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीचे विधान केल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले होते.
या बैठकीत उद्धव ठाकरेंनी तयारीला लागा, मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, कार्यकर्त्यांपर्यंत जा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी संपर्कप्रमुखांना दिले आहेत. राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे. निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका कधीही लागू शकतात, असेही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगितल्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहे. एकूण परिस्थिती पाहता शिवेसेनेचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. पण जनतेत काम करणारी मंडळी आता कोणीच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे शिवेसना आता द्विधा मनस्थितीत आहे, त्यामुळे आपले कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वातावरण निर्मिती करायचे काम सध्या उद्धव ठाकरे गटाकडून केली जात असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले.