महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांपैकी भाजपाने (BJP) पहिल्या प्रथम उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 99 उमेदवारांची यादी भाजपाने जाहीर केली आहे. त्यात मुंबईमधील 14 उमेदवार आणि महामुंबईत 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात बहुतांश ठिकाणी सीटिंग आमदारांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याचे दिसत आहे.परंतु मुंबईत तीन ठिकाणी विद्यमान आमदारांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने त्यांची धाकधुकी वाढली आहे.
(हेही वाचा BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू)
‘या’ आमदारांसाठी वेट अँन्ड वॉच
भाजपाच्या (BJP) पहिल्या यादीत बोरिवली येथील आमदार सुनील राणे, वर्सोवा येथील भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्व येथील पराग शाह या ३ विद्यमान आमदारांना प्रतिक्षेत ठेवले आहे. बोरिवली येथे भाजपाने खासदारकीचे तिकीट कापलेले गोपाळ शेट्टी हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत पीयूष गोयल यांच्यासाठी गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे बोरिवली विधानसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांना भाजपा (BJP) तिकीट देऊ शकते, असे बोलले जाते. घाटकोपर पूर्व येथे मागील निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले प्रकाश मेहता यांचे नाव आघाडीवर आहे. प्रकाश मेहता हे माजी मंत्री आहेत, परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली होती. आता घाटकोपर पूर्व येथील पराग शाह यांच्याऐवजी प्रकाश मेहतांच्या नावाची चर्चा आहे. तर वर्सोवा येथील भारती लव्हेकर यांचीही उमेदवारी धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील या जागांवर भाजपा कुणाला संधी देते ते पाहणे गरजेचे आहे.
Join Our WhatsApp Community