Bandra मतदारसंघात Congress मध्ये बंडखोरीची शक्यता; उमेदवारीचा वाद थेट राहुल गांधी दरबारी!

210
Bandra मतदारसंघात Congress मध्ये बंडखोरीची शक्यता; उमेदवारीचा वाद थेट राहुल गांधी दरबारी!
  • खास प्रतिनिधी 

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये (Congress) धुसपुस वाढत असून इच्छुक एक ना दोन, तब्बल २२ उमेदवारांनी पक्षाकडे तिकीटाची मागणी केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वांद्रे पश्चिम मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता हा प्रश्न मुंबई अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष यांच्या कोर्टात नव्हे तर थेट राहुल गांधी यांच्या दरबारी गेला आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : भाजपा उमेदवारांची नावे निश्चित…फडणवीस,बावणकुळे दिल्लीला रवाना; नेमकं कारण काय ?)

प्रिया दत्त इच्छुक नाही

काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेस (Congress) अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी माजी खासदार प्रिया दत्त यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि पक्षातर्फे विधानसभा निवडणूक लढवावी अशी विनंती केली आहे. त्यावर दत्त यांनी कोणतेही आश्वासन न देता निर्णय पक्षावर सोडला. वांद्रे पश्चिमच्या कार्यकर्त्यांची १० ऑक्टोबर २०२४ रोजी बैठक झाली त्यात वर्षा गायकवाड यांच्यासह प्रिया दत्त, माजी नगरसेवक आसिफ झकेरिया, राजेश शर्मा आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

(हेही वाचा – Uddhav Thackeray यांच्यावर दुसऱ्यांदा झाली अँजिओप्लास्टी)

२२ इच्छुक

बैठकीत प्रिया दत्त यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की त्या निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक नाहीत, पण पक्षाने तिकीट दिले तर लढणार. यावेळी वर्षा गायकवाड, प्रिया दत्त, झकेरिया यांची भाषणे झाली मात्र शर्मा यांना मत मांडण्याची संधी दिली गेली नाही. तर अन्य काहीनी आपणही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. जवळपास इच्छुक उमेदवारांची संख्या २२ असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा – Conversion : शोएबचा हिंदू महिलेवर धर्मांतरासाठी दबाव, हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप)

पक्षाचा कौल झकेरिया

काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर वांद्रे परिसरातील वातावरण काँग्रेसच्या (Congress) बाजूने झुकलेले दिसत असून मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी पक्षाने केल्याचे समजते. त्यामुळे माजी नगरसेवक आशिफ झकेरिया यांच्या बाजूने पक्षाचा कौल दिसत असून त्यांना तिकीट मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पठडीत वाढलेल्या शर्मा यांना काँग्रेसमध्ये आणखी काही काळ संधीची वाट पहावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.