या दोन सहायक आयुक्तांच्या नावासमोर लागणार उपायुक्तपदाची पाटी

या दोन्ही सहायक आयुक्तांची उपायुक्तपदी बढती देण्याचा प्रस्ताव विधी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या दोन सहायक आयुक्तांची बढती उपायुक्तपदी करण्यात आली आहे. महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त केशव उबाळे आणि ए-विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांना उपायुक्तपदी बढती देण्यात आली आहे. या दोन्ही सहायक आयुक्तांची उपायुक्तपदी बढती देण्याचा प्रस्ताव विधी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

प्रस्तावाला मंजुरी

मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांच्या सेवा ज्येष्ठता यादीनुसार चंदा जाधव आणि केशव उबाळे हे उपायुक्त तथा उपायुक्त (सुधार) या पदावरील पदोन्नतीची अर्हता पूर्ण करत असल्याने, त्यांच्या नावाची शिफारस उपायुक्त पदासाठी करण्यात आली होती. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या विधी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर यांनी मंजूर केला.

(हेही वाचाः नालेसफाईची कंत्राटे मान्य, पण रस्ते विकास कामांची अमान्य: एकाच अतिरिक्त आयुक्तांकडून असे का घडते?)

कोण आहेत जाधव व उबाळे?

चंदा जाधव या ए-विभागाच्या सहायक आयुक्त असून, सर्वप्रथम सी-विभागाच्या सहायक आयुक्त म्हणून त्यांनी काम सांभाळले होते. त्यानंतर विविध विभागांच्या सहायक आयुक्तपदाची धुरा वाहिल्यानंतर सध्या त्या ए-विभागाच्या सहायक आयुक्तपदी काम करत आहेत. तर केशव उबाळे यांनी सर्वाधिक काळ एफ-उत्तर विभागाचे सहायक आयुक्तपद सांभाळले होते. त्यानंतर सध्या ते मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त म्हणून काम करत आहेत.

मागील सात ते आठ महिन्यांमध्ये सहायक आयुक्त संजोग कबरे, संगीता हसनाळे, देविदास क्षिरसागर, भाग्यश्री कापसे आदी सहायक आयुक्तांना उपायुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

(हेही वाचाः पी- उत्तर विभागाला सहायक आयुक्त मिळेना! सर्वाधिक लोकसंख्या असलेला विभाग वाऱ्यावर!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here