माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलाकडून सध्या बडतर्फ सचिन वाझे यांची उलट तपासणी सुरु आहे. ही तपासणी करणा-याची उलट तपासणी आयोगासमोर मंगळवारी सुरू असताना अनिल देशमुख यांचे वकील हजर न राहिल्याने चांदिवाल आयोगाने अनिल देशमुखांना 50 हजारांचा दंड ठोठावला. हा 50 हजारांचा दंड मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
म्हणून आयोगाची केली स्थापना
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये या आयोगाची स्थापना केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी बडतर्फ केलेल्या सचिन वाझेला एनआयएने अटक केली होती. त्यानंतर वाझेला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. देशमुखांच्या वकिलांनी वाझेची उलटतपासणी करण्याची परवानगी मागितली होती. विशेष न्यायालयाने देशमुखांच्या वकिलांना ही परवानगी दिली होती. त्यासोबतच देशमुखांना चांदिवाल आयोगासमोर हजर राहण्याचीही परवानगी दिली होती. आतापर्यंत दोन वेळा अनिल देशमुखांच्या वकिलांनी वाझेची उलट तपासणी केली आहे.
याआधी परमबीर सिंगाना देण्यात आला वाॅरंट
या अगोदर सप्टेंबर महिन्यात वसुलीचा आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ५० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. परमबीर सिंग हे आयोगासमोर उपस्थित राहत नाही. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागत आहे. म्हणून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जावे, असे आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी म्हटले होते. यावर आयोगाने परमबीर सिंग यांना ५० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
( हेही वाचा :आता तक्रार निवारण्यासाठी सरकार येणार तुमच्या दारी )