तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविवार ११ सप्टेंबर रोजी भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानुसार नायडू यांना १४ दिवस राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Gadchiroli Police : ताडगावच्या जंगलातून ३ नक्षलवाद्यांना अटक)
चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात मुख्य सूत्रधार असल्याचे आंध्र प्रदेश पोलिसांनी म्हंटले होते. या कथित घोटाळ्यामुळे आंध्र प्रदेश सरकारचे ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अटक केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नायडू यांना शनिवार १० सप्टेंबर रोजी रात्री ३:४० वाजता वैद्यकीय तपासणीसाठी विजयवाडा येथील शासकीय सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. याअगोदर त्यांची (Chandrababu Naidu) कुंचनपल्ली येथे सुमारे १० तास चौकशी करण्यात आली.
#WATCH | Vijayawada, Andhra Pradesh | TDP leaders Kesineni Nani and others met former Andhra Pradesh CM and TDP chief N Chandrababu Naidu at ACB court before the judgement.
Naidu was arrested by the CID in connection with the alleged Skill Development cooperation scam on… pic.twitter.com/d0DEkHCVnu
— ANI (@ANI) September 10, 2023
सीआयडी पथकाने माजी केंद्रीय मंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता नांद्याल शहरातील ज्ञानपुरम येथील आरके फंक्शन हॉलच्या बाहेरून अटक केली. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या बसमध्ये झोपलेले असताना चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community