देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल (Lok Sabha Election Result 2024) जाहीर झाले आहेत. इंडि आघाडीच्या नजरा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) भाग असलेले तेलुगू देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांच्यावर आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे एनडीएमधुन बाहेर पडण्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. सर्वत्र सुरू असणाऱ्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. (Chandrababu Naidu)
(हेही वाचा –“माझ्या आयुष्यातील सर्वांत विचित्र…”, पराभवानंतर Pankaja Munde नेमकं काय म्हणाल्या?)
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चंद्राबाबू म्हणाले की, “काळजी करू नका. तुम्हाला बातमी हवी आहे. देशात अनेक राजकीय बदल होताना मी पाहिले आहेत, पण मी एनडीएमध्येच राहणार आहे. एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी दिल्लीला जात आहे.” निवडणुकीतील विजय आणि लोकसभा निवडणुकीत टीडीपीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आणि आम्ही एनडीएमध्येच राहू असं स्पष्ट केलं आहे. (Chandrababu Naidu)
भाजपसाठी टीडीपीचा पाठिंबा का महत्त्वाचा?
आंध्र प्रदेशच्या 175 जागांच्या विधानसभेत टीडीपीला 135 जागा, पवन कल्याणच्या जनसेनेला 21 आणि भाजपला 8 जागा मिळाल्यात. याशिवाय टीडीपीनं लोकसभेच्या 16 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत भाजपनं 240 जागा जिंकल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी टीडीपीचा पाठिंबा आवश्यक आहे. अशा परिस्थितीत चंद्राबाबू नायडू यांची भूमिका स्पष्ट केल्यानं भाजपला केंद्रात सरकार स्थापन करणं सोपं होईल. (Chandrababu Naidu)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community